Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"सत्यजीत तांबेंना भाजपा पाठिंबा देणार?"; गिरीश महाजन म्हणाले.

"सत्यजीत तांबेंना भाजपा पाठिंबा देणार?"; गिरीश महाजन म्हणाले.


नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीतील राजकीय नाट्यानंतर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या लढतीचे चित्र आता स्पष्ट झालं आहे. नाशिकमध्ये आता 16 उमेदवार रिंगणामध्ये असून ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे यांच्यामध्ये सरळ लढत पाहायला मिळणार आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीत सलग तीन वेळा आमदार राहिलेले डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, ऐनवेळी काँग्रेस पक्षाचा आदेश झुगारुन सुधीर तांबे यांनी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज भरला आणि तिथूनच राजकीय वातावरणात बदलाला सुरवात झाली. तर, दुसरीकडे नाशिकमध्ये भाजपाने उमेदवार जाहीर केला नाही.

त्यामुळे सत्यजीत तांबेंना भाजपा पाठिंबा देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर मंत्री गिरीश महाजन  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "त्यांनी पाठिंबा मागितला तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे योग्य निर्णय घेतील. कारण, आम्हालाही जागा निवडून आणायची आहे. लवकरच यावर निर्णय होईल. तसेच, आमच्याकडे उमेदवाराची लाईनच होती. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या मनात वेगळी काहीतरी रणनिती असेल.

त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे." दरम्यान, सत्यजित तांबे अथवा मी भाजपचा पाठिंबा मागितला नाही आणि मागणार देखील नाही अशी प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी दिली आहे. आमच्या पक्षश्रेष्ठीचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आम्ही त्याबाबत त्यांच्यासोबत बसून चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.