Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अर्जंट कॅश हवीये पण ATM कार्ड जवळ नाही?

अर्जंट कॅश हवीये पण ATM कार्ड जवळ नाही?


UPI ने जीवन खूप सोपे केले आहे. याद्वारे तुम्ही कोणतीही खरेदी सहजपणे करू शकता किंवा कुठेही ऑनलाइन पैसे भरून तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण करू शकता. मात्र काही कामांसाठी कॅश गरजेची असते. कॅश काढायची असेल तर जवळ एटीएम कार्ड जवळ असायला हवे.

पण समजा तुमच्याकडे एटीएम कार्ड नाही, तुमचे एटीएम कार्ड हरवले किंवा घरीच राहिले तर तुम्ही काय कराल? अशा परिस्थितीतही तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही UPI द्वारे कॅश ट्रांझेक्शन देखील सहज करू शकता. आजच्या काळात, SBI, HDFC, PNB सारख्या सर्व बँका कार्डलेस व्यवहाराची सुविधा देतात. याची सीक्रेट ट्रिक आपण जाणून घेणार आहोत.

तुम्ही BHIM, Paytm, Gpay, Phonepe इत्यादी कोणताही आयडी वापरत असाल तर हे ट्रांझेक्शन करता येईल. वरील पैकी कोणतेही अॅप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल केलेला असला पाहिजे आणि इंटरनेट कनेक्शन देखील असले पाहिजे. यानंतर तुम्ही एटीएममध्ये जाऊन कॅश विड्रॉलचा ऑप्शन निवडा Withdraw Cash चा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला एटीएम स्क्रीनवर UPI ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल.

यानंतर एटीएम स्क्रीनवर क्यूआर कोड दिसेल. तुमच्या फोनवर UPI पेमेंट अॅप उघडा आणि QR स्कॅनर कोड चालू करून QR कोड स्कॅन करा. स्कॅन केल्यानंतर अमाउंट सिलेक्ट करा, प्रोसीड या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला UPI पिन टाकावा लागेल, तो टाकून तुम्ही कॅश ट्रांझेक्शन करु शकता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.