Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या

शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या


शिंदे गटातील निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी विष प्राशन केल्यानंतर गुरुवारी रात्री त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.पुण्यात राहत्या घरी विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.माझिरे हे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची मनसेमधून हकालपट्टी करण्यात आली होती त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेनामध्ये प्रवेश केला होता.

माझिरे हे मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थ होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, कौटुंबिक वादातून माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली असली तरी हा वाद नेमका काय होता हे अजून कळलेलं नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.