Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाचा दणका..

विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाचा दणका..


आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बँकांचे कोट्यवधींचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. फरार झालेल्या विजय मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्याचा निकाल मुंबई न्यायालयाने दिला होता. मल्ल्याने या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही मल्ल्याला दणका दिला आहे. त्यामुळे आता त्याची मालमत्ता जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मल्ल्याला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करून त्याची मालमत्ता जप्त करण्याच्या मुंबई न्यायालयाच्या कारवाईला आव्हान देणारी मल्ल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आता मल्ल्याला एकाच वेळी दोन मोठे धक्के बसले आहेत. एकीकडे तो आर्थिक गुन्हेगार राहणार आहे, तसेच त्याची मालमत्ता जप्त करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

अशिलाकडून कोणतीही माहिती मिळत नाही. त्यांच्याशी संप्रकच होत नसल्याने आपल्याला त्यांच्याबाबत काहीही माहिती नाही. त्यांच्याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही, तसेच त्यांच्याशी संपर्कही होत नाही, असा दावा करत मल्ल्या यांच्या वकिलांना खटला लढवण्यास असमर्थता व्यक्त केली होती. मल्ल्या यांच्या बाजूने लढणारे वकील स्वतः अनेक मुद्द्यांवर स्पष्ट नव्हते. त्यामुळे न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.

नुकत्याच झालेल्या सुनावणीत ईसी अग्रवाल यांनी मल्ल्याचा खटला लढण्यास नकार दिला होता. त्यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाला सांगितले की, माझ्या माहितीनुसार विजय मल्ल्या अजूनही ब्रिटनमध्ये आहे. पण ते माझ्याशी बोलत नाहीत. माझ्याकडे फक्त त्यांचा ईमेल पत्ता आहे. आता आम्ही त्यांचा शोध घेऊ शकत नसल्यामुळे, मला त्यांचे प्रतिनिधित्व करण्यापासून मुक्त केले पाहिजे. त्यानंतर न्यायालयाने मल्ल्याला दणका देत त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.