महाराष्ट्राच्या राजकारणात आता गौतमी पाटीलची एन्ट्री..
सध्या राज्यात डान्सर गौतमी पाटीलची जोरदार चर्चा सुरू आहे. तिच्या डान्सने लोकांना वेड करून सोडलं आहे. कमी वेळात ती प्रसिद्धीच्या खूप उंच शिखरावर पोहोचली आहे. तिचा डान्स बघण्यासाठी लोकं दूरवरून प्रवास करून येत आहेत. तसेच अनेकदा तिचा डान्स वादात देखील सापडला आहे. असे असताना भाजप आणि शिवसेनेची सध्या मुंबईत आशीर्वाद यात्रा सुरु आहे.
या यात्रेतला शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांचा एक मॉर्फ केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल करण्यात आला. या प्रकरणावरुन संबंधितांना अटक झाली. पण याच मुद्द्यावरुन शरद कोळी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच या गौतमी पाटीलसोबत मध्यंतरी एक अनपेक्षित प्रकार घडला. तिला नकळत कपडे बदलत असतानाचा तिचा व्हिडीओ बनवला. नंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
या दोन्ही प्रकरणांवरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे गौतमीच्या नावाची या निमित्ताने राजकारणात एन्ट्री झाली आहे. आपण कधीही राजकारणात जाणार नाही, असे गौतमीने आधीच स्पष्ट केले आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल? याचा काहीच भरोसा नाही.
गौतमी राजकारणात कधी येणार तर नाहीच. पण तिच्या नावावरुन महाराष्ट्रातले राजकारण तापू शकत. कारण ठाकरे गटाच्या धडाकेबाज नेते शरद कोळी यांनी तिचे नाव घेत न्यायाची मागणी केली आहे. यामुळे सध्या चर्चा सुरू झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
