Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चक्क झुडपात लपवून ठवलेल्या 11 मोटारसायकल, लॅपटॉप आणि मोबाईल पोलीसानी केले जप्त

चक्क झुडपात लपवून ठवलेल्या 11 मोटारसायकल, लॅपटॉप आणि मोबाईल पोलीसानी केले जप्त 


सोलापूर : चोरी केल्यानंतर झुडपात दडवून ठेवलेल्या ११ बाईक पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यासह चोरीतील दोन लॅपटॉप, ५ मोबाईल असा एकूण जवळपास तीन लाखाचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतला  या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

चोरी केलेले दोन लॉपटॉप घेऊन एक आरोपी कर्णिक नगर येथे थांबलेला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सपोनि संजय क्षीरसागर यांच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी उमेश नागनाथ भोसले ( वय २५, रा. भगवान नगर झोपडपट्टी) याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केल्यानंतर त्याने ७ मोटारसायकल व दोन लॅपटॉप आणि ५ मोबाईल चोरल्याचे कबूल केले.

पोलिसांनी त्याच्याकडून वरील एकूण २ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच सपोनि श्रीनाथ महाडीक यांना मिळालेच्या माहितीवरून प्रशांत यल्लप्पा शिवशरण ( वय २६, रा. रुपाभवानी मंदीराजवळ) याला ताब्यात घेत त्याच्याकडून तीन दुचाकी व मार्केट यार्ड परिसरात एका संशयित इसमाचा पाठलाग करत वैजनाथ शाहू कोळेकर ( वय १९, रा. जय मल्हार नगर बाळे) असे पकडले. त्याच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.