RRR च्या अभूतपूर्व यशानंतर राम चरण चर्चा सिनेजगताला रामराम?
दाक्षिणात्य कलाजगतामध्ये प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या आणि अभिनेता राम चरण गेल्या काही महिन्यांपासून यशाच्या परमोच्च शिखरावर आहे. राम चरण च्या आनंदाचं कारण संपूर्ण जगाला ठाऊक आहे. एस.एस. राजामौली यांच्या RRR या चित्रपटातील गाण्यानं जगभरात वाजवलेला डंका आणि थेट ऑस्करपर्यंत मारलेली मजल, हीच त्याच्या आनंदाचं आणखी एक कारण आहे, किंबहुना हे कारणही त्याच्या मनाच्या अतिशय जवळचं आहे.
आतापर्यंत तुम्हालाही याचा अंदाज आला असावा. कारण, या अभिनेत्यानं हे खास आणि तितकंच गोड कारणं कुणापासूनही लपवलेलं नाही. ते म्हणजे तो बाबा असल्याचं. या अभिनेत्याच्या घरी लवकरच बाळाचा प्रवेश होणार आहे. त्याची पत्नी उपासना गरोदर असून, आता काही दिवसांतच एक गोंडस बाळ या कुटुंबातील नवखं सदस्य ठरणार आहे. याच निमित्तानं सध्या खुद्द राम चरण आणि त्याची पत्नी काही महत्त्वाचे निर्णय घेताना दिसत आहेत.
पत्नीला साथ देण्यासाठी सर्वकाही...
मागील बऱ्याच काळापासून राम चरणसोबत विविध कार्यक्रमांना त्याच्या पत्नीनंही हजेरी लावली. किंबहुना या नाजुक काळात तो पत्नीची साथ क्षणभरही सोडताना दिसत नाहीये. त्यातच बाळाच्या जन्मानंतरही तिला पुरेसा वेळ देत आपल्या कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवण्याचा निर्णय त्यानं घेतला आहे. यासाठीच जवळपास तीन महिने किंवा त्याहून जास्त काळासाठी तो चित्रपट जगताला तात्पुरता रामराम ठोकणार आहे.सिनेजगतातील माहिती प्रसिद्ध करणाऱ्या काही वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार मे महिन्याच्या अखेरीस राम आणि उपासना यांच्या बाळाचा जन्म होईल. यानंतरचा वेळ अभिनेता पत्नी, बाळ आणि कुटुंबासोबत व्यतीत करू इच्छितो. त्यामुळंच तो या निर्णयावर पोहोचला आहे. लग्नानंतर जवळपास 10 वर्षांनी या सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात ही गोड चाहूल लागल्यामुळं ते दोघंहीहा संपूर्ण काळ मनमुराद जगताना दिसत आहेत. हल्लीच त्यांनी मालदीवला जाऊनही काही निवांत क्षणांचा आनंद घेतल्याचं पाहायला मिळालं होतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.