Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सीपीआर आवारात 2 मृत अभ्रके आढळले...

सीपीआर आवारात 2 मृत अभ्रके आढळले...



कोल्हापूर: शहरातील शासकीय छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या आवारात आज सकाळी धक्कादायक घटना पहायला मिळाली आहे. आज सकाळी आठच्या सुमारास सीपीआर आवारात 2 मृत अभ्रके आढळ्याने परिसरात खळबळ उडालीय. 

सीपीआर परिसरातील भटक्या कुत्र्यांनी अभ्रके येथे आणली असल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय. सीपीआर आवाराच्या पाठीमागील भिंती लगत आतल्या बाजूस एक मोठा कोंडाळा आहे. मागील बाजूने अज्ञातांनी 2 अभ्रके  कोंडाळ्यात टाकली असावीत अशी चर्चा या ठिकाणी सुरू आहे. 

सध्या घटनास्थळी लक्ष्मीपुरी पोलिस पोहचले असून हा नेमका काय प्रकार आहे याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. मात्र आज सकाळी उघडकीस आलेल्या या प्रकाराने सीपीआर आवारात एकच खळबळ उडाली आहे. सद्या ही दोन्ही अभ्रके शवविच्छेदन ग्रहात ठेवण्यात आली आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध होत नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.