उचगांवात एका युवकाचा खून...
कोल्हापूर: उचगांव येथील कृषी महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस धारदार शस्त्राने वार करून एका युवकाचा खून करण्यात आलाय. काल (बुधवारी) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून आज सकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आलाय. गणेश नामदेव संकपाळ (वय. ४०) असे त्याचे नाव असून तो उचगांव येथील गणेश कॉलनीचा रहिवासी आहे. गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात यांनी घटनास्थळ येऊन पंचनामा केला. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.