पोलिस भरतीचा निकाल जाहीर
कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस भरती प्रक्रियेतील लेखी आणि शारीरिक परीक्षेचा निकाल आज जाहीर झाल. २४ उमेदवारांची आज पोलिस म्हणून निवड झाली. भरती प्रक्रीयेतील अंतिम टप्प्यात १९१ पैकी २४ यशस्वी उमेदवारांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे पोलिस प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले.
कोल्हापूर जिल्हा पोलिस भरती २०२१ मध्ये पोलिस शिपाई पदाच्या २४ पदांसाठी एकूण ३ हजार १३४ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. यासाठी १ हजार ४५८ उमेदवार हजर होते. पात्र उमेदवारांपैकी १ः१० प्रमाणे २८६ तरुण लेखी परीक्षेस पात्र ठरले होते. प्रत्यक्षात परीक्षेवेळी १९१ उमेदवार हजर होते. त्यातून लेखी आणि शारीरिक परीक्षेतील एकत्रित गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती यादी प्रसिद्ध झाली आहे. www.kolhapurpolice.gov.in या संकेतस्थळावर ही यादी प्रसिद्ध केली असल्याचे गृह पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.