पत्रकारांना सुरक्षा, पेन्शन व टोल माफी करू : मंत्री सुरेश खाडे
सांगली : सांगली येथे केंद्रीय पत्रकार संघातर्फे खरे सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रम झाला. कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले, पत्रकारांना टोल माफी, होणारे हल्लेविरोधी कडक कारवाई तसेच पत्रकारांना पेन्शन मिळावी यासाठी प्रयत्न करु. मनसेचे राज्य उपाध्यक्ष पुंडलिक जाधव यांनी, पत्रकारांमुळेच आम्ही जनतेपुढे येतो. त्यामुळे आम्ही पत्रकारांच्या पाठीशी सदैव राहू व त्यांच्या वेदना आणि मागण्या नक्कीच समजुन घेवू.
राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसाळकर यांनी, केंद्रीय पत्रकार संघटना ही विविध मागण्यांद्वारे पत्रकारांना हक्क व न्याय मिळवून देणसासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. पत्रकारावर हल्ला झाल्यास पत्रकार संरक्षण हक्क कायद्याअंतर्गत न्याय मिळवून देऊ. जिल्हयाच्या ठिकाणी पत्रकारांना जागा मिळवून देण्याचे सांगितले.
यावेळी देवेश गुप्ता, धनंजय पाठक, पोलिस निरीक्षक पवार, आनंदा पाटील, महंमद आत्तार, पींकी कागवाडकर, महेश भिसे, नयना पाशी, आकांक्षा, रविंद्र लोंडे, संजय पवार, सदानंद माळी, गौरव शेटे, प्रदिप थोरात, बाळासाहेब घेवडे, पंकज गाडे, अजित कुलकर्णी, संजय पवार, सदानंद माळी आदी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
