Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसचे शर्म करो मोदी शर्म करो' आंदोलन

काँग्रेसचे शर्म करो मोदी शर्म करो' आंदोलन



पुलवामा हल्ल्याबद्दल काँग्रेसचे शर्म करो मोदी शर्म करो' आंदोलन सत्यपाल मलिकांच्या प्रश्नावर खुलासा करा पृथ्वीराज पाटील

सांगली, दि. १७ : पुलवामा हल्ल्याबद्दल जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल, भाजपा नेते सत्यपाल मलिक यांनी खुलासा करूनही मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर निषेध करण्यासाठी काँग्रेसतर्फे 'शर्म करो मोदी शर्म करो'  आंदोलन आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे करण्यात आले.  आंदोलनाचे नेतृत्व सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील व डीसीसी बॅंक उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी केले.

यावेळी श्री. पाटील म्हणाले, भाजपचे वरिष्ठ नेते, जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व ३०० कोटींच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. सत्यपाल मलिक यांनी केलेले आरोप, भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. पुलवामा घटनेमध्ये ४० जवानांचे बळी गेले आणि त्यात सरकारची चूक असणे हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना गप्प राहण्यास सांगितले, असा थेट आरोप मलिक यांनी केला असून त्यांच्या आरोपांचे पंतप्रधान मोदींनी अद्यापही उत्तर दिलेले नाही.

श्री. पाटील म्हणाले, मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात संशय व संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे खालील प्रश्‍नांवर 'शर्म करो मोदी शर्म करो' हे आंदोलन सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्याचे निर्देश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांनी दिले होते. असे आहेत प्रश्न, पुलवामा घटनेत केंद्र सरकारची अक्षम्य चूक झाली आहे, या वक्तव्यावर मलिक यांना गप्प राहण्यास का सांगितले गेले? भारतीय जवांनाना दुसरीकडे पाठविण्यासाठी विमानाची मागणी केली असता, ती का नाकारण्यात आली?

पुलवामा घटनेत वापरले गेलेले ३०० किलो आर.डी.एक्स. कुठून आले? पुलवामा घटना व ४० जवानांचे बलिदान, हे भाजपा व नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी केले होते का?  मलिक यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन महासचिव राम माधव यांनी ३०० कोटी रुपयांची ऑफर का दिली? 

श्री. पाटील म्हणाले, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत आणि ना-खाऊंगा, ना-खाने दूंगा अशी गर्जना करणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी या प्रश्‍नांचा खुलासा करुन सत्य काय आहे, ते जाहीर केले पाहिजे. यासाठी ''शर्म करो मोदी, शर्म करो" हे आंदोलन तीव्र स्वरुपात करण्यात आले. 

यावेळी नगरसेवक संतोष पाटील, बिपीन कदम, आशिष कोरी, नंदाताई कोलप, रविंद्र वळवडे, महावीर पाटील, अल्ताफ पेंढारी, मौलाली वंटमुरे, शितल सदलगे, विजय आवळे, आयुब निशानदार, सुशांत गवळी, अमित पारेकर, श्रीनाथ देवकर, माणिक कोलप, अमोल पाटील, राजेंद्र कांबळे, सुजित लकडे, उत्तम सुर्यवंशी, दिक्षीत भगत, गजानन आवळे आदि मान्यवर उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.