Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विठ्ठल चरणी एका भाविकाने तब्बल 1 कोटी 24 लाखांचे दागिने केले अर्पण

विठ्ठल चरणी एका भाविकाने तब्बल 1 कोटी 24 लाखांचे दागिने केले अर्पण 

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात  आतापर्यंत अनेक भाविकांनी वस्तू वा रोख रकमेच्या स्वरूपात दान अर्पण केले आहे. त्यात आता जालना येथील एका भाविकाने श्री विठ्ठलचरणी तब्बल दोन किलो वजनाचे सोन्याचे दागिने  अर्पण केले आहेत.

जालना : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आतापर्यंत अनेक भाविकांनी वस्तू वा रोख रकमेच्या स्वरूपात दान अर्पण केले आहे. त्यात आता जालना येथील एका भाविकाने श्री विठ्ठलचरणी तब्बल दोन किलो वजनाचे सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. या सर्व दागिन्यांची बाजारभावानुसार जवळपास 1 कोटी 24 लाख रूपये किंमत आहे.

गेल्या तीन महिन्यापूर्वीच या भाविकाने तब्बल पावणे दोन कोटी रुपये मूल्य असलेले सोन्याचे दागिने अर्पण केले होते. त्यानंतर आताही त्याने तब्बल दोन किलो वजनाचे 1 कोटी 24 लाखांचे सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. आत्तापर्यंत या भाविकाने तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. या भाविकाने हे दान देताना त्याचे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर हे सर्व केले आहे. तसेच, काही महिन्यांपूर्वी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी कुटुंबीयांनी श्री विठ्ठलचरणी 11 लाख रुपयांचे दान अर्पण केले होते. त्यानंतर आता इतक्या मोठ्या स्वरूपात देणगी प्राप्त झाली आहे.

नाव गोपनीय ठेवण्याची विनंती

जालन्यातील या भाविकाने आत्तापर्यंत दोनदा अशा स्वरूपात देणगी, दान दिले आहे. त्याने दोन्ही वेळेस सोन्याचे दागिने तेही कोट्यवधी किमतीचे अर्पण केले आहेत. असे करताना त्याने कोणताही पुष्पहार स्वीकारला नाही. इतकेच नाहीतर त्याने त्याचे नाव गोपनीय ठेवण्याची विनंतीही मंदिर प्रशासनाकडे केल्याचे सांगितले जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.