Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील भांडारात 400 किलो सोनं-चांदी

पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील भांडारात 400 किलो सोनं-चांदी


जगन्नाथपुरी:  जगन्नाथ पुरी मंदिर सर्वांनाच परिचित आहे. 861 वर्ष जुनं असलेल्या या मंदिराबाबतच्या अनेक गूढ कथा, प्रसंग यांची चर्चा नेहमीच होत असते. या मंहिरात एक रत्न भांडार असून, ते गेले 39 वर्ष कुलुपबंद अवस्थेत आहे. गेल्या 39 वर्षांपासून हे भांडार उघडण्यातच आलेलं नाही. या भांडारातील आतल्या भागाच्या कुलुपाची किल्ली कुणाकडे आहे, याची माहितीच कुणाला नसल्याचं सांगण्यात येतयं. या मंदिराच्या खजिन्यात 150 किलो सोनं आणि 250 किलो चांदी  असल्याचं सांगण्यात येतंय. आता हा खजिना उघडण्याची मागणी भाजपा  आणि काँग्रेसच्या वतीनं कतरण्यात आलीय. तसचं या संपत्तीचं, खजिन्याचं ऑडिट करा, अशीही मागणी करण्यात आलीय. या प्रकरणात हायकोर्टानं ओडिशा सरकारकडं 10 मे पर्यंत उत्तर मागितलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पुरीच्या मंदिरात असलेल्या खजिन्याबाबत भाजपा आणि काँग्रेसनं 4 प्रश्न उपस्थित केलेल आहेत.

1. 39 वर्षांपासून बंद असलेलं रत्न भांडार अद्याप उघडण्यात का आलेलं नाही?

2. रत्न भांडारातील आतल्या कक्षाची किल्ली नसल्याचं सरकार सांगतंय. मग ही किल्ली कुणाकडे आहे, आणि त्याची जबाबदारी कुणाची आहे?

3. सरकारनं आत्तापर्यंत या मंदिराच्या खजिन्याचं ऑडिट का केलेलं नाही?

4. न्यायालयीन आयोगानं याबाबता अहवाल 2018 साली ओडिशा सरकारकडं दिलेला आहे, सरकारनं हा अहनाल सार्वजनिक का केला नाही?

आता या प्रकरणी 10 जुलैपर्यंत उत्तर देण्याचे आदेश ओडिशा हायकोर्टानं सरकारला दिलेत. सत्ताधारी बिजू जनता दलानं 1985 पासून हे रत्नभांडार उघडण्यात आलेलं नसल्याचं सांगितलंय. भाजपा या प्रकरणात राजकारण करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे.

रत्न भांडारात सव्वा लाख तोळं सोनं

जगन्नाथ मंदिराचा इतिहास लिहिलेल्या जगदा पंजी या पुस्तकात मंदिराच्या तळघरात खजिना असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. या खजिन्याला रत्न भांडार नावानं ओळखलं जातं. यात दोन कक्ष आहेत. बाहेरच्या कक्षात देवतांच्या पूजेसाठी वापरण्यात आलेलं साहित्य आणि देवांचे दररोजचे दागिने, आभूषणं ठेवण्यात आली आहेत. याची किल्ली मंदिर प्रशासनाकडं आहे. तर आतल्या कक्षात देवाला आत्तापर्यंत अर्पण करण्यात आलेलं सोनं-चांदी ठेवण्यात आलेलं आहे. या खजिन्याची किल्ली गेल्या अनेक वर्षांपासून गायब आहे. यात सर्वाधिक सोनं असल्याचं सांगण्यात येतंय. 1978 साली या रत्न भांडारात नेमकी किती संपत्ती होती याची मोजदाद करण्यात आली होती. त्यानंतर दरवर्षी येणाऱ्या सोन्या चांदीचा हिशोबच ठेवण्यात आलेला नसल्याचं सांगण्यात येतंय. 1984 साली पुन्हा खजिन्याची मोजदाद करण्यात आली होती. मात्र त्याची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यानंतर आत्तापर्यंत जवळपास 39 वर्ष याची तपासणीच करण्यात आलेली नाही. या तळघरात 150 किलो सोनं आणि 258 किलो चांदी असल्याचं सांगण्यात येतंय.

2018च्या कोर्टाच्या आदेशानंतरही मोजदाद नाहीच

2018 साली मंदिर व्यवस्थापन समितीच्या बैठकीत किल्ली हरवल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जून 2018 मध्ये किल्ली हरवली असल्याची माहिती मिळाल्याचं 2019 साली जाहीर केलं. त्यानंतर ओडिसा हायकोर्टानं 16 सदस्यांची टीम रत्न भांडाराच्या तपासणीसाठी पाठवली. 40 मिनिटांच्या तपासणीनंतर ही टीम बाहेर आली. या टीमनं केवळ भांडारातील बाहरेच्या कक्षाचीच तपासणी केली. आत जाण्याची परवानगी त्यांना देण्यात आली नाही. आता या खजिन्याचं ऑडिट करण्याची मागणी पुन्हा जोर धरते आहे.

जगन्नाथ पुरीच्या मंदिराकडे कोट्यवधींची जमीनही

जगन्नाथ मंदिराच्या नावावर 7 राज्यांत 60 हजार एकर जमीन आहे. त्यात

पश्चिम बंगाल- 322 एकर

महाराष्ट्र-28 एकर

मध्य प्रदेश-25 एकर

आंध्र प्रदेश-17 एकर यांचा समावेश आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.