एसबीआयसह इतर पाच बॅंकांना 1017.93 कोटींचा गंडा; सातजणांविरोधात गुन्हा दाखल
एसबीआय तुमचे या पाच बँकांमध्ये पैसे असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची ठरू शकते. याचं कारण म्हणजे एसबीआय इतर पाच बँकांना एका कंपनीने कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून सीबीआय ने कंपनीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नेमके हे प्रकरण काय आहे समजून घेऊया. रायगडमधील लोहा इस्पात लिमिटेड कंपनीसोबत सात जणांविरोधात सीबीआय कठोर कारवाई केली आहे.
या कंपनीने SBI सह इतर पाच बँकांना देखील 1017.93 कोटी रुपयांचा मोठा गंडा घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये SBI सह बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रचा समावेश आहे. या बँकांकडून मुदत कर्ज आणि एनएफबी मर्यादेचा लाभ घेऊन 1017.93 कोटी रुपये हडपले. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने याबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण बाहेर आलं. आरोपींनी 2012 ते 2017 या कालावधीमध्ये वेगवेगळ्या बँकांकडून 812.07 कोटींचं वर्किंग कॅपिटल, मुदत कर्ज घेतली होती. आता हे कर्ज बुडवल्याचा आरोपही केला जात आहे.एसबीआय ने दाखल केलेल्या तक्रारीनंतर लोहा इस्पात कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश पोद्दार, संचालक संजय बन्सल, हमीदार राजेश अगरवाल, अंजू पोद्दार आणि मनीष गर्ग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सीबीआय ने ही कारवाई केली असून या प्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे. यामध्ये आणखी कोणाचे लागेबांधे आहेत का याचा देखील तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.