वडिलांचा खून करून मुलाने केली आत्महत्या
कोल्हापूर : क्षुल्लक वादातून मुलाने वडिलांचा खून करून त्यानंतर त्याने स्वत: देखील गळफास घेत आत्महत्या केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
सागर गावडे असे मृत मुलाचे नाव आहे. तर मनोहर गावडे असे मृत वडिलांचे नाव आहे. मुलगा आणि वडील दोघेही चंदगडच्या देसाई वसाहतीमध्ये राहत होते. घटना घडली त्या दिवशी दोघेही शेजारी राहणाऱ्या एका नातेवाईकाच्या घरी गेले होते. तेथे त्यांनी रात्रीचे जेवण केले. त्यानंतर ते आपल्या घरी परतले. घरी आल्यावर या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला त्यानंतर ही घटना घडली.सागर आणि मनोहर या दोघांनाही दारूचे व्यसन होते. या व्यसनामुळेच त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी देखील दोघांनी खूप दारू पिली होती. त्यानंतर त्यांच्यात भांडणे झाली. यावेळी घरी कोणीही नव्हते. त्यामुळे त्यांची भांडणे सोडवता आली नाही. घरी कोणी नाही हे पाहून सागरने वडिलांचा खून केला. त्यानंतर त्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाल्याने त्याने स्वत:ला गळफास घेऊन आत्महत्या केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.