24 वर्षीय संकर्ष चंदा बनला 100 कोटींचा मालक
लोकानं कदाचित तरुण वयातील नवीन गुंतवणूकदारांबद्दल माहिती नसेल. आता या यादीत एका २४ वर्षीय मुलाचे नाव सामील झाले आहे, ज्याने कॉलेजला जाण्याच्या वयात शेअर बाजाराचा मार्ग स्वीकारला आणि तो कोट्यधीश झाला.
कधी शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांचा उल्लेख येतो, तेव्हा दिवंगत राकेश झुनझुनवाला, राधाकिशन दमानी, विजय केडिया, आशिष कोचलिया आणि डॉली खन्ना यांच्यासह अनेक बड्या गुंतवणूकदारांची नावे लोकांच्या समोर येतात. पण भारतात अनेक तरुण गुंतवणूकदारांनीसुद्धा शेअर बाजारातून लाखोंनी पैसा कमावला आहे. लोकांना कदाचित तरुण वयातील नवीन गुंतवणूकदारांबद्दल माहिती नसेल. आता या यादीत एका २४ वर्षीय मुलाचे नाव सामील झाले आहे, ज्याने कॉलेजला जाण्याच्या वयात शेअर बाजाराचा मार्ग स्वीकारला आणि तो कोट्यधीश झाला.
हैदराबाद येथील संकर्ष चंदा (२४) यानं केवळ १७ वर्षांचा असताना भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी संकर्षने शेअर मार्केटमधून १०० कोटी रुपये कमावले. खरं तर हे खूपच आश्चर्यचकित करणारे आहे, कारण बहुतेक गुंतवणूकदार आणि व्यापारी सुरुवातीला शेअर बाजारात पैसे गमावतात. संकर्षने शेअर बाजारातून करोडोंची कमाई करण्याचा हा चमत्कार कसा साध्य केला हे जाणून घेऊयात
२००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली
संकर्षने २०१६ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. यादरम्यान तो बेनेट युनिव्हर्सिटी (ग्रेटर नोएडा) मधून बीटेक कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यास करीत होता, परंतु शेअर बाजारातील आवडीमुळे त्याने अभ्यास सोडला. संकर्षने अवघ्या २००० रुपयांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. डीएनएच्या रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत संकर्ष म्हणतो, “मी २ वर्षात शेअर बाजारात सुमारे १.५ लाख रुपये गुंतवले आणि २ वर्षांच्या कालावधीत माझ्या शेअर्सचे बाजार मूल्य १३ लाख रुपये झाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.