जितेंद्र आव्हाड यांचा पीए 5 जिल्ह्यांतून तडीपार
ठाणे : माजी मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे खाजगी पीए अभिजीत पवार यांना पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करण्यात आले आहे. अभिजीत पवार यांच्यावर विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने त्यांना हद्दपार करण्यात आल्याचे ठाणे पोलिसांचे म्हणणे आहे.
ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सातजणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि विशंत गायकवाड या चौघांना नौपाडा पोलिसांनी अटक केली होती. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. असे असताना ठाणे पोलिसांनी त्यांच्याविरोधात हद्दपारी कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती.
मार्चमध्ये ठाणे पोलिसांनी चौघांना तडीपारीची नोटीस बजावली आहे. तुम्हाला ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर आणि रायगड जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार का केले जाऊ नये असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यावर चौघांनी उत्तरासाठी मुदत मागितली होती. अखेर रविवारी ठाणे पोलिसांनी अभिजीत पवार यांना हद्दपार केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.