राज्य उत्पादन शुल्कच्या 7 निरीक्षकांच्या बदल्या
मुंबई: राज्य उत्पादन शुल्कच्या राज्यातील 7 निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या सहीने सोमवारी बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. कोल्हापूर विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक संजय डेरे यांची ठाणे येथील डी विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्यातील नंदकुमार जाधव यांची पुण्याच्या भरारी पथकाकडे, पुण्यातील भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांची ठाण्याच्या भरारी पथकाकडे नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर येथील भरारी पथकाचे निरीक्षक संजीव देवरे यांची मुंबई उपनगरच्या भरारी पथकाकडे बदली करण्यात आली आहे. पालघरचे निरीक्षक भानुदास फणसेकर यांची पनवेल येथे तुळजापूर येथील निरीक्षक सचिन भवड यांची गडहिंग्लज येथे बदली करण्यात आली आहे. औरंगाबाद भरारी पथकाचे निरीक्षक विजय रोकडे यांची दौंड येथे बदली करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.