आईचा डीएनए चाचणीचा रिपोटर् मिळतो वडिलांचा का नाही?
सांगली : राज्यात गाजलेल्या अनिकेत कोथळे खून प्रकरणाची सुनावणी गेल्या आठवड्यात झाली. यावेळी तत्कालीन तपास अधिकाऱ्यांची प्रकृती बिघडल्याने सुनावणी होऊ शकली नाही. मात्र शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी बचाव पक्षाचे वकील अड. विकास शिरगावकर अनेक मुद्दे उपस्थित केले. या प्रकरणात अनिकेतच्या आईचा डीएनए रिपोटर् सरकारी पक्षाला मिळाला आहे. मात्र त्याचवेळी त्याच्या वडिलांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी घेऊनही त्यांचा रिपोटर् का मिळाला नाही असा प्रश्न शिरगावकर यांनी उपस्थित केला. त्यावेळी सीआयडीच्या प्रभारी अधिकारी आरिफा मुल्ला यांनी हा रिपोटर् अद्याप प्राप्त झाला नसल्याचे लेखी निवेदन न्यायालयासमोर सादर केले. या निवेदनावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचीही सही आहे, अशी माहिती बचाव पक्षाचे वकील विकास शिरगावकर यांनी सांगली दर्पण शी बोलताना दिली.
अनिकेतच्या मृतदेहाचे अवशेष आंबोलीतील कावळेसाद येथे सापडल्यानंतर त्याची १३ नोव्हेंबर २०१७ रोजी डीएनए चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल सरकारी पक्षाला ३० नोव्हेंबर २०१७ रोजी प्राप्त झाला. या चाचणीसाठी अनिकेतची आई आणि त्याचे वडील अशोक कोथळे यांचे नमुने घेण्यात आले होते. त्यातील अनिकेतच्या आईच्या डीएनए चाचणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र या घटनेला पाच वषार्हून अधिक काळ लोटला तरी अनिकेतच्या वडिलांचा डीएनए चाचणीचा अहवाल अद्याप सरकारी पक्षाला मिळाला नाही, असेही शिरगावकर यांनी यावेळी सांगितले.दरम्यान अनिकेत कोथळेच्या डीएनए चाचणीच्या अहवालावर सरकारी पक्षातफेर् सीआयडीच्या उपधीक्षक आरिफा मुल्ला यांनी अनिकेतच्या वडिलांच्या डीएनए चाचणीचा अहवाल अद्याप मिळाला नसल्याचे लेखी निवेदन न्यायालयात सादर केले आहे. त्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचीही सही असल्याचे अड. शिरगावकर यांनी यावेळी सांगितले.
डीएनए चाचणीच्या अहवालात गोलमाल असून पोलिस अधिकारी, पंच यांच्या पंचनाम्यावर असलेल्या स्वाक्षरीमध्येही तफावत असल्याचे मत अड. शिरगावकर यांनी न्यायालयात स्पष्ट केले. शिवाय पोलिस अधिकाऱ्यांचे टॅवर लोकेशनही सुसंगत नसल्याचे अड. शिरगावकर यांनी युक्तीवादात मांडल्याचे सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.