कपिल सिब्बल यांनी कॉंग्रेसला दिला हा सल्ला
दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करणे हे कठीण काम होते, पण काँग्रेसने ते साध्य करून दाखविले आहे. आता पुढील पाच वर्षांच्या काळात पक्षाने राज्यातील लोकांची मने जिंकण्याचे काम करावे, असा सल्ला खा.कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला दिला आहे.
काँग्रेसने खुलेपणा, प्रामाणिकता व भेदभावविरहित काम करावे, असे सांगतानाच यातील एकही गुण भाजपकडे नसल्याचा टोला खा. सिब्बल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मारला. अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. या विजयामुळे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पुढील वर्षीच्या मध्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.