एक्साईज दुय्यम निरीक्षक परीक्षेत सांगलीचा अभिजित साळुंखे मागासवगीर्यात राज्यात प्रथम
मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामाफर्त गट-क सेवा (मुख्य परीक्षा) मधील राज्य उत्पादन शुल्कच्या दुय्यम निरीक्षक संवगार्चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सांगलीतील अभिजित अशोक साळुंखे हे मागासवगीर्य प्रवगार्तून राज्यात प्रथम आले आहेत. तर कोल्हापूरच्या अक्षता कुपटे या महिला प्रवगार्तून राज्यात प्रथम आल्या आहेत.
अंतिम निकालानुसार ९ उमेदवारांची दुय्यम निरीक्षक पदाकरता शिफारस करण्यात आली आहे. राज्यातील मुंबई, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे आदी केंद्रांवर फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत सोलापूर येथील अनिकेत सिद्धेश्वर माने-देशमुख राज्यात प्रथम आले आहेत.या परीक्षेचा निकाल आणि प्रत्येक प्रवगार्करता शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांचे गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठवल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांत आयोगाकडे विहित नमुन्यात अजर् करावेत असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.