रुग्णांचे भविष्य डॉक्टराइतकेच परिचारिकांच्या हातात आहे; अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर
सांगली दिं.१४ रुग्णांचे भविष्य डॉक्टराइतकेच परिचारिकांच्या हातात आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी व्यक्त केले. जागतिक परिचारिका दिना निमित्ताने येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात परिचारिका दिन साजरा करण्यात आला.
यावेळी या रुग्णालयातील ज्येष्ठ परिचारिका शैलजा सुहास सावर्डेकर यांना त्यांच्या उत्कृष्ट व आदर्श रुग्णसेवे बद्दल ट्रेंड नर्सेस असोसिएशन यांच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्या हस्ते हा "जीवन गौरव" पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून नंतर बोलत होते. या समारंभाला ट्रेंड नर्सेस असोसिएशनचे पदाधिकारी व नर्सिंग स्टाफ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.