कर्मवीर पतसंस्थे तर्फे क्रिडाई सांगली चे अध्यक्ष श्री. जयराज सगरे यांचा सत्कार
सांगली :- सांगली क्रिडाई च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. जयराज सगरे यांचा कर्मवीर पतसंस्था सांगली वतीने संचालक मंडळ सभेमध्ये सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले.
प्रास्ताविकात त्यांना सांगली शहराच्या सर्वांगिन विकासासाठी शहराला जोडणारे मुख्य रस्ते त्याच बरोबर उपनगरामधील रस्ताची सुधारणा झाली तर सांगली शहराचा विकास होईल अशी भावना व्यक्त केली. तसेच संस्थेच्या माध्यमातून गृह प्रकल्पांना कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याची योजना आखता येईल. त्याचा लाभ बांधकाम व्यावसायिकांनी घ्यावा असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.क्रिडाई च्या माध्यमातून शहरातील कांही प्रश्नाचा पाठपुरावा शासन दरबारी व्हावा.. त्यासाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय संस्थाच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करावा त्यासाठी आवश्यक पाठबळ द्यावे लागले तरी ते उभा करु अशी सुचना श्री. रावसाहेब पाटील यांनी केली. सत्काराला उत्तर देताना श्री. जयराज सगरे यांनी कर्मवीर पतसंस्थेच्या प्रगतीचे तोंड भरून कौतुक केले. एका लहानशा खोलीतुन सुरु झालेल्या संस्थेचा वटवृक्ष झाल्याचे त्यांनी सांगितले. कर्मवीर आण्णांचे कार्य संस्थेने पेलले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
शहराला जोडण्याऱ्या मार्गाचा केंद्र शासनाच्या माध्यमातून पाठ पुरावा सुरु आहे. तसेच राज्याचे नगर विकास मंत्री यांना भेटून सांगलीच्या विकासाबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. मॉडेल सिटीच्या स्वरुपात सांगली शहराचा विकास होण्यासाठी अभ्यास सुरु असल्याचे व त्यासाठी केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांना सुद्धा भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराबद्दल त्यांनी संस्थेचे आभार व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे संचालक डॉ. रमेश ढबू. . श्री. ओ. के. चौगुले (नाना), श्री. वसंतराव धुळाप्पाणा नवले. डॉ. एस. बी. पाटील ( वसंतराव मोटके) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील अॅड. एस. पी. मगदूम संचालिका श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे श्री. लालासो भाऊसो थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम यांचे सह अधिकारी वर्ग उपस्थित होते...
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.