विटा-महाबळेश्वर रस्त्यावर भीषण अपघात चौघे जागीच ठार
सुनीता सदानंद काशीद (वय ६१), चंद्रकांत दादोबा काशीद (वय ६२), अशोक नामदेव सूयर्वंशी (वय ६४), योगेश विलास कदम (वय ३५, सवर् रा. गव्हाण) अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर सदानंद दादोबा काशीद जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी एक ट्रॅव्हल्स (क्र. एआर ०१ जे ८४५२) विट्याहून महाबळेश्वर रस्त्यावरून भरधाव वेगाने साताऱ्याच्या दिशेने निघाली होती. विट्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या शिवाजीनगर येथे समोरून येणाऱ्या एका कारने (एमएच ४७ केजी ९५४) ट्रॅव्हल्सच्या चालकाच्या बाजूला जोराची धडक दिली. कारमधून पाचजण प्रवास करत होते.
भरधाव कारने ट्रॅव्हल्सला दिलेली धडक इतकी भीषण होती की कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालकाशेजारी बसलेले सदानंद काशीद वेळीच एअरबॅग उघडल्याने आश्चयर्कारकरित्या बचावले. या अपघातात ट्रॅव्हल्समधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच विटा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. यातील जखमींना तातडीने विट्यातील रूग्णालयात हलवण्यात आले. तर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आले. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवल्याने वाहतूक सुरळीत झाली. याबाबत विटा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.