Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दोन गाड्यांच्या अपघात एक महिला ठार

दोन गाड्यांच्या अपघात एक महिला ठार 




सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील पती-पत्नी बोलेरो पिकअपने वाशी येथे आंबे विक्रीसाठी जात होते. त्यावेळी रायगड येथे मुंबई गोवा महामार्गावर सिलेंडर ट्रकला पाठिमागून बोलेरो चालकाने जोरदार धडक दिली. हा अपघात पेणजवळील हमरापूर येथील ब्रीजवर बुधवारी पहाटे घडला. या अपघाता पत्नी जागीच ठार झाली आहे तर पती गंभीर जखमी झाला आहे. अपघातात बोलेरे वाहनाचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे.

याबाबत माहिती अशी कि, फिर्यादी सुमित चंद्रकांत खवळे, रा. तारा, मुंबरी देवगड जि. सिंधदुर्ग हे बुधवार दिनांक 3 मे रोजी आपल्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम.एच. 07 ए.जे. 2682 यामध्ये देवगडवरून मुंबईला वाशी मार्केटला आंबे विक्री साठी घेऊन जात होते. पहाटे 4 : 15 च्या सुमारास पेणजवळील हमरापूर फाटा येथील ब्रीजवर आले असता पुढे असणार्‍या ट्रकला ओव्हरटेक करीत असताना पीकअपने क्लिनर बाजूकडून जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता कि, बोलेरो पीकअप व अपघातग्रस्त हे ट्रकच्या मागच्या बाजूस अडकून पडले होते.

या अपघातात बोलेरो चालक सुमित चंद्रकांत खवळे वय( 28) हा गंभीर जखमी झाला तर त्याची पत्नी स्पृहा सुमित खवळे वय (24) ही जागीच ठार झाली. यावेळी अपघातस्थळी दोन्ही वाहने एकमेकांत अडकून असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघाताचे वृत्त कळताच कल्पेश ठाकूर यांनी रुग्णांना आपल्या रुग्णवाहिकेतून तात्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी दादर सागरी पोलीस व पेण पोलीसांनी घटनास्थळी जावून अडकलेल्या दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अधिक तपास दादर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सतिश पाटील हे करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.