Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईत आलेल्या एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार

चित्रपटाच्या शूटिंगसाठी  मुंबईत आलेल्या एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार 



मुंबई हे महिलांसाठी सुरक्षित शहर म्हणले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतही महिलांवरील गुन्ह्यामध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. महिल्यांवरील गंभीर तक्रारी सुद्धा विविध पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, मुंबई,मरीन ड्राईव्ह परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी हरियाणावरून मुंबईत आलेल्या एका १९ वर्षीय तरुणीवर तिच्याच सहकाऱ्याने मरीन ड्राईव्ह परिसरात बलात्कार केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या ३५ वर्षीय आरोपी मित्राला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांना ओळखतात. ते बुधवारी हरियाणातून चित्रपटाच्या शूटिंगसाठी एकत्र मुंबईत आले होते. रविवारी शूटिंग संपल्यानंतर १९ वर्षीय तरुणी आणि तिचा ३८ वर्षीय सहकारी मरीन ड्राईव्ह परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबले होते.

पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने मित्राने रात्री तिच्या रुमची बेल वाजवली. दार उघडताच त्याने रुममध्ये जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. पीडितेने विरोध केला असता, तिला जीवे मारण्याची धमकी दिली. रविवारी रात्रभर तो तिच्यावर बलात्कार करत राहिला.

पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिच्या ३५ वर्षीय आरोपा मित्राला अटक केली असून त्याला कोर्टात हजर केले असता, कोर्टाने १२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.