उतारा कसा टाकायचा हे सांगण्यासाठी आली अनं घरातील सोन्यावर डल्ला मारून गेली
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथे उतारा टाकण्यासाठी आलेल्या मांत्रिक महिलेने पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना घडली.
दागिन्यांसह रोख रक्कम असा चार लाखांचा मुद्देमाल घरातून लुटून नेल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणात मांत्रिक रेश्मा शेख (रा. कुडची ता. रायबाग जि.बेळगाव) हिच्या विरोधात मिरासो मकबूल बागसार (रा. निमशिरगाव) यांनी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक मिळालेल्या माहितीनुसार निमशिरगावात मिरासो बागसारांच्या घरी उतारा टाकण्यासाठी मांत्रिक रेश्मा ही रविवारी रात्री आली होती. यावेळी रेश्माने उतारा तयारू दिला आणि मिरासो बागसारांना तो टाकण्यासाठी बाहेर पाठवून दिले.
याच मुदतीत घरी कोणी नसल्याचे पाहून लोखंडी तिजोरीच्या चाव्या घेत तिजोरीतील 13 ग्रॅम वजनाचे मिनी गंठण, एका डोळ्याचा नेकलेस, सोन्याच्या पट्टीतील मंगळसूत्र व रोग सहा हजार 800 रुपये असा एकूण चार लाखांचा मुद्देमाल लुटून नेला. उतारा टाकून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.