Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री हे होणारजॉइन्ट किलर ?

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री हे होणारजॉइन्ट किलर ?


बंगळुरू: फक्त एक दिवस प्रचार आणि 1 लाखांच्या फरकाने विजयी झालेले काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार सध्या चर्चेत आहे. सतत 8 वेळा आमदार झालेले डीके कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचा वरिष्ठ नेता आणि कर्नाटकचे मंत्री आर. अशोक यांच्याविरोधात कनकपुरा येथून उभे राहिले होते. डीके शिवकुमार यांनी भाजपच्या नेत्याला तब्बल 1 लाख मतांच्या फरकाने हरवलं आहे. त्यामुळे डीके पुन्हा एकदा जायंट किलर म्हणून समोर आले आहेत.

डीके शिवकुमार कर्नाटकमधील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. कनकपूरा सीटमधून सातत्याने 8 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले डीके शिवकुमार अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहत आहेत. 2013 मध्ये ते जेडी (s) PGR सिधिंयांना हरवून 30,000 हून अधिक मतांनी निवडून आले होते. केवळ सिधिंयाच नाही तर शिवकुमार यांनी जद (s) सुप्रीमो आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि त्यांचा मुलगा एच डी कुमारस्वानी यांना बंगळुरू ग्रामीणमधून हरवलं आहे.

या यशानंतर त्यांना जाइंट किलर नावाने ओळख मिळाली.   बेळगावमध्येही भाजप-काँग्रेसमध्येच टक्कर; महाराष्ट्र एकीकरण समितीला धक्का?काँग्रेसचे संकटमोचक शिवकुमार यांना रणनीतीकारदेखील मानलं जातं. आणि संकटाच्या काळात पक्षासाठी ते धावून जातात अशीही ख्याती आहे. त्यांनी 2018 च्या निवडणुकीनंतर कर्नाटकात काँग्रेस आणि जदच्या आघाडी सरकारचं गठण होण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.

केवळ कर्नाटकच नाही तर त्यांनी बंगळुरू आणि महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांना पाठबळ दिलं. कारण त्यावेळी विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाच्या सरकारला संकटाचा सामना करावा लागला होता. डीकेएस 2017 मध्ये चर्चेत डीकेएस यांनी 2017 मध्ये चर्चेत आले होते. गुजरात राज्यसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी गुजरात काँग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये जाण्यासाठी रोखण्यासाठी पार्टीला बंगळुरूमधील आपल्या रिसॉर्टमध्ये घेऊन जाण्यास मदत केली होती. शिवकुमार कर्नाटकमधील सर्वात श्रीमंत राजकीय नेत्यांपैकी एक आहेत. 2018 मधील निवडणुकीत नामांकन दाखल करताना त्यांनी 840 कोटींची संपत्ती असल्याची घोषणा केली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.