Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जरंडीत बापानेच केला मुलाचा खून, आत्महत्येचा केला होता बनाव

जरंडीत बापानेच केला मुलाचा खून, आत्महत्येचा केला होता बनाव 


तासगाव : जरंडी (ता. तासगाव) येथील मंडले वस्ती येथे गुलाब भगवान मंडले (वय ५२) याने स्वतःचाच मुलगा विशाल गुलाब मंडले (१८) याचा खून करून आत्महत्येचा बनाव रचल्याचा भांडाफोड झाला. ९ मे रोजी खून करून रात्री अंत्यविधी केल्यानंतर तासगाव पोलिसांना सुगावा लागला आणि शुक्रवारी रक्षाविसर्जनालाच जरंडीत जाऊन खुनाचा उलगडा केला. संशयितावर रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून, याबाबत विशालच्या आईने फिर्याद दिली आहे.

गुलाब मंडलेचा मुलगा विशालला दारूचे व्यसन होते. विशाल अविवाहित होता. त्याने बुधवारी वडिलांकडे लग्नाचा तगादा लावला. यातून ९ मे रोजी दोघांत जोरदार वाद सुरू झाला. विशालला गुलाबने एचटीपी पाइपने मारहाण केली. गुप्तांगावर फटका बसल्याने तो जागीच मृत झाला. त्यानंतर गुलाबने बनाव रचला आणि विशालने आत्महत्या केल्याचे शेजाऱ्यांना सांगितले. घाईगडबडीत रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले.

शुक्रवारी विशालचे रक्षाविसर्जन होते. दरम्यान, गुलाबने विशालचा खून करून अंत्यसंस्कार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती कळल्यानंतर शुक्रवारी रक्षाविसर्जनाच्या वेळीच पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे आणि त्यांच्या पथकाने जरंडी येथे धाव घेतली. मृत विशालच्या कुटुंबीयांकडे कसून चौकशी केल्यानंतर गुलाबने खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला तासगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

एका मुलाच्या लग्नादिवशी दुसऱ्या मुलाचा खून

गुलाब मंडलेच्या मोठ्या मुलाचे दोन वर्षांपूर्वी ९ मे रोजी लग्न झाले. याच दिवशी धाकट्या मुलाने लग्नावरून वाद सुरू केल्यामुळे, बाप-लेकात झालेल्या भांडणात बापाने मुलाचा याचा खून केला. खून झाल्यानंतर रक्षाविसर्जन होईपर्यंत विशालने आत्महत्या केली, अशीच माहिती गावात होती. मात्र पोलिसांनी गुलाबला ताब्यात घेतल्यानंतर या खुनाची मोठी चर्चा झाली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.