Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अनैतिक संबंधातून दिराने केला हॉटेल मध्ये भावजयीचा खून!

अनैतिक संबंधातून दिराने केला हॉटेल मध्ये  भावजयीचा खून!


आटपाडी :  अनैतिक संबंधातून दिरानेच भावजयीचा गळा दाबून, भिंतीवर डोके आपटून खून केला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आटपाडी शहरातील हॉटेल स्टार येथे ही घटना घडली. आटपाडी पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी संशयित दिराला ताब्यात घेतले आहे.

छाया मधुकर देवडकर (वय 27, रा. विठ्ठलनगर आटपाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. नानासो हणमंत देवडकर (वय 33, रा. पिंजारी वस्ती निंबवडे) असे संशयिताचे नाव आहे. आटपाडी बाजार समितीच्या समोर हॉटेल स्टार व लॉज आहे. नानासो याने गुरुवारी दुपारी चारच्या दरम्यान लॉजमधील एक खोली बुक केली होती.

शनिवारी सकाळी त्या खोली मधून दुर्गंधी येत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यावर खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी तेथे छाया देवडकर हिचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच घटनास्थळी आटपाडी पोलिसांनी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. दरम्यान नानासो याने छाया हिचा खून केल्यानंतर लॉजमधील खोलीला कुलूप लावून किल्ली घेऊन पसार झाला होता. त्यावेळी त्याने छायाचा मृतदेह बेडखाली ठेवला होता. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत संशयित नानासो देवडकर याला ताब्यात घेतले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.