Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजित पवार: राज्यात बदल्यांचे रेट फिक्स

अजित पवार: राज्यात बदल्यांचे रेट फिक्स


सातारा :  राज्यात भ्रष्टाचार बोकाळला असून बदल्यांचे रेट ठरल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे. ते सातारा येथील कार्यक्रमात बोलत होते. कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक तसेच कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघ व कोरेगाव तालुका खादी ग्रामउद्योग संस्थांमधील नवीन संचालकांचा सत्कार आज आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारचा समाचार घेतला.

अजित पवार म्हणाले, आत्ताच्या सरकारमध्ये बदल्यांचे रेट ठरले आहेत. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. सत्तेत आम्ही होतो पण सत्तेचा माज आम्ही केला नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारवर सडकून टीका केली. आत्ताचे मंत्री कुणाला विचारत नाहीत, मंत्रालयात बसत नाहीत. वेगवेगळी लोकं कामं करुन देण्यासाठी मार्केटमध्ये फिरत आहेत, असा गंभीर आरोप अजित पवारांनी केला.

अजित पवार पुढे म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेचा माज चढला आहे. केवळ ठराविक आमदारांना सांभाळायचं चालले आहे. निधी देताना मुद्दाम आडकाठी आणली जाते. सरकारचे मंत्री कोणाला विचारत नाहीत. मंत्रिमंडळात बसत नाहीत. काही जणांकडून घाणेरडे शब्द वापरले जातात. हे सर्व पाहून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या डोळ्यात पाणी येत असेल असेही अजित पवार म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.