सत्ता संघर्षाच्या निकालांनंतर सरकार कोसळणार? बच्चू कडू यांनी सांगितली 'अंदर की बात '
अमरावती : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागणार आहे. याच आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे. याबाबत बच्चू कडू यांना विचारले असता सरकार स्थिर राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टाचा निकाल काही येऊ दे, सरकार हेच राहील. एकनाथ शिंदे आणि पंधरा आमदार अपात्र होणार नाहीत. त्यांनी कोर्टात ठोस कगदपत्रं सादर केली आहेत, त्यामुळे हे सरकार स्थिर राहणार असल्याचा दावा शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. सभेवरून निशाणा दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीसह सत्ताधाऱ्यांवर देखील सभांवरून निशाणा साधला आहे.एकाने सभा घेतली की दुसरा सभा घेतो हा मूर्खपणा असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, माझे मंत्रिपद गेले, मला अजूनही मंत्रीपद मिळालेले नाही तरी मी खूश आहे. कारण दिव्यांगांसाठी मंत्रालयाची स्थापना झाली. सध्या तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं वाटत नाही, मंत्रिमंडळाचा विस्तार हा आता 2024 नंतरच होईल असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. अजित पवारांना टोला दरम्यान यावेळी बच्च कडून यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देखील जोरदार टोला लगावला आहे. आम्ही पहिल्यांदा गुवाहाटीला गेलो तेव्हाच दिव्यांग मंत्रालयाचा विषय पुढे आला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा गेलो तेव्हा दिव्यांग मंत्रालयाची स्थापना झाली. इथे खोक्याचा विषय नाही.
मागचे सरकार होते तेव्हा अडीच वर्षांत दिव्यांगांची फाईल पुढे सरकली नाही. अनेकदा अजित पवारांकडे फाईल घेऊन गेलो, काहीच झालं नाही. आम्ही सरकारला पाठिंबा देऊनही आमच्याच फाईल अडकल्या होत्या. पैसे घेऊन फाईल पुढे सरकत होत्या असा खळबळबजनक आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.