राम कथा वाचायला आला अन यजमानांच्या बायकोलाच घेऊन गेला; आचार्य धीरेंद्र याच्या शिष्याचा प्रताप
पोलिसांनी त्या महिलेचा शोधही सुरू केला. महिन्याभरानंतर जेव्हा फिर्यादीची पत्नी सापडली, तेव्हा पोलिसांनी तिला पोलिस ठाण्यात बोलावून जबाब घेतला. पण, आश्चर्याची बाब म्हणजे तेव्हा त्या महिलेने पतीसोबत राहण्यास सरळ नकार दिला.
चित्रकूट धामचे धीरेंद्र आचार्य यांचे शिष्य नरोत्तम दास दुबे यांच्यासोबतच आपल्याला रहाये आहे, अशी इच्छा त्या महिलेने व्यक्त केली. खरंतर, या प्रकरणाची सुरुवात 2021 पासून झाली. जेव्हा महिलेचे पती राहुल तिवारी यांनी गौरीशंकर मंदिरात रामकथेचे आयोजन केले होते. चित्रकूटचे कथाकार धीरेंद्र आचार्य यांना कथा वाचनासाठी बोलावण्यात आले. आचार्य त्यांचे शिष्य नरोत्तम दास दुबे यांच्यासोबत रामकथेचे वाच करण्यासाठी आले होते.या प्रकरणी पती राहुल यांनी असा आरोप केला आहे की, कथा वाचनादरम्यान त्यांच्या पत्नीला नरोत्तम दास दुबे याने त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. आणि त्यानंतर तिचा मोबाईल नंबर घेऊन दोघांनी बोलणे सुरू केले. 5 एप्रिल रोजी नरोत्तमने राहूल यांच्या पत्नीला पळवून नेले.
या प्रकरणी जिल्ह्याचे एसपी अमित सांघी सांगतात की, वादामुळे महिलेला पतीसोबत राहायचे नव्हते, त्यामुळे कोणतीही केस दाखल होऊ शकत नाही. पण तरीही पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.