Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पत्नीचा खून करून पती रात्रभर मृतदेहाजवळ बसला; सकाळी सासरच्यांना फोन करून...

पत्नीचा खून करून पती रात्रभर मृतदेहाजवळ बसला; सकाळी सासरच्यांना फोन करून...


हिंगोली : शाब्दिक वादातून मारहाण करीत पत्नी योगीता संतोष कऱ्हाळे (वय २८) हिचा गळा आवळून खून केल्याची घटना तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे ६ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. खून केल्यानंतर पती रात्रभर पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वसमत तालुक्यातील सोन्ना येथील योगीता यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील संतोष बळीराम कऱ्हाळे याच्यासोबत झाला. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होत होते. ६ मे रोजी संतोष कऱ्हाळे याची आई दोन्ही लहान मुलांसह नातेवाईकांकडे लग्नाला गेली होती, तर वडील शेतात गेले होते. रात्री संतोष व त्याची पत्नी योगीता यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. त्यातच संतोषने योगीताला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे योगीता जमिनीवर कोसळली. त्यानंतर संतोषने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर संतोष पत्नीच्या मृतदेहाजवळ रात्रभर बसून राहिला.

७ मे रोजी सकाळी त्याने सोन्ना येथे योगीता यांच्या माहेरी संपर्क साधून तिचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र, तिचा खून झाल्याच्या संशयावरून योगीताच्या माहेरच्या लोकांनी हिंगोली ग्रामीण पोलिसांना कळविले. त्यावरून पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, उपनिरीक्षक मगन पवार, जमादार विकी कुंदनानी, शेख महमद, रामराव चिभडे, जाधव, आकाश पंडितकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देत संतोष कऱ्हाळे यास ताब्यात घेतले. त्यानंतर मयत योगीताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला. या ठिकाणी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.