समृद्धी महामार्गावर इनोव्हा गाडीचा अपघात होऊन 4 ठार तर 5 जण गंभीर जखमी
बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर १२/०६/२०२३ रोजी १२:०४ वाजेच्या सुमारास महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर हद्दीतील हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर किमी ५५५.८ येथे घोटी बाजू कडून शिर्डी बाजू कडे जाणारी इन्होवा कार क्र MH-19 Y- 6074 हिचे वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदरची कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण भिंतीवर जावून आदळल्याने अपघात झाला.
सदर अपघातात रज्जाक अहमद शेख (वय-५५) सत्तार शेख लाल शेख (वय- ६५ ३) सुलताना सत्तार शेख (वय - ५० फियाज) दगूभाई शेख (वय 40) हे मयत झाले. जुबेर रज्जाक शेख (वय-३५) मैरूनिसा रज्जाक शेख (वय-४५) अझर बालन शेख (वय २५) मुस्कान अजर शेख (२२) हे गंभीर जखमी झाले असून जखमींना औषधोपचारासाठी ॲम्ब्युलन्सने सिन्नर येथे पाठविण्यात आले आहे.अपघात ग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. पोलीस उप अधीक्षक प्रदीप मौराळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी, महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर, महाराष्ट्र सुरक्षा पथक, जलद प्रतिसाद पथक समृध्दी महामार्ग यांनी अतिशय अतिशय जलद घटनास्थळी धाव घेऊन शिताफीने जखमींना अपघात ग्रस्त वाहनातून बाहेर काढून ॲम्ब्युलन्सने सिन्नर येथे औषधोपचारासाठी दाखल करून ५ जणांचा जीव वाचविण्यात यश आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.