सांगलीमध्ये होणार बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन ;राज्य प्रवक्ते संतोष पाटील.
जिल्हा रोजगार,स्वयंम रोजगार व मराठा स्वराज्य संघच्या वतीने येत्या १४ जूनला सकाळी 11 ते 3 या वेळेत अनंतसाई,डी जी इस्टेट, दक्षिण शिवाजीनगर, बुलढाणा अर्बन बँकेजवळ, चांदणी चौक, सांगली या ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे या मेळाव्यासाठी टाटा मोटर्स,बजाज महिंद्रा आणि महिंद्रा, गोदरेज, महाबळ मेटल, एस के एफ इंडिया लिमिटेड, इलेक्ट्रॉनिक सिस्टम कंट्रोलर,किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, कल्याण इंडस्ट्री लिमिटेड,सूर्या इंडस्ट्री लिमिटेड, शिवअमृत फूड इंडस्ट्री व अनेक नामवंत कंपन्या आपली नोकर भरती करण्यासाठी मुलाखतीस येणार आहेत.
तसेच सांगली व मिरज एमआयडीसीतील अनेक कंपन्यांचा सहभाग असून या संधीचा बेरोजगार युवक युवती यांनी इंजिनिअरिंग विभागातील सिविल, मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक,फार्मसी डिप्लोमा डिग्री होल्डर,दहावी बारावी व ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या तसेच आयटीआय केलेल्या सांगली शहरातील व जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी सहभाग घेऊन आपल्या सर्व कागदपत्रासह आकारा ते तीन या वेळेत उपस्थित राहून नोकरी पक्की करून घ्यावी अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी पत्रकार बैठकीमध्ये आवाहन केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.