पुणे महसूल विभागाचे अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांच्या घरी सीबीआय चा छापा; मोठे घबाड हाती.
पुणे महसूल विभागाचे अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांच्या बाणेर गावातील ऋतूपूर्ण सोसायटीत दुपारी एकच्या सुमारास 'सीबीआय'चे सुमारे 10 ते 12 अधिकारी आले. यामध्ये काही महिला अधिकाऱ्यांच्या समावेश होता. सोसायटीच्या सुरक्षेला न जुमानता या आधिकाऱ्यांनी त्यांनी थेट इमारतीच्या 'सी' विंगमधील चौथ्या मजल्यावर जात रामोड यांच्या घराचा ताबा घेतला.घराचा दरवाजा लावून घेत त्यांनी चौकशी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास 'सीबीआय
च्या आधिकाऱ्यांचा ताफा बाणेरमधील ऋतुपर्ण सोसायटीच्या प्रवेशद्वारात आला. सरक्षा यंत्रणेला न जुमानता त्यांनी थेट 'सी' विंगमधील रामोड यांच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट गाठला. घरात जाताच दरवाजा लावून घेतला. सोसायटीचे सुरक्षा व्यवस्थापक तातडीने त्या ठिकाणी गेले. मात्र, महिला आधिकाऱ्याने दरवाजा उघडला व तपासणी सुरू आहे. तुम्ही थोड्या वेळाने या असे या आधिकाऱ्याने सुरक्षा व्यवस्थापकास सांगितले.
अधिकाऱ्यांनी एकाचवेळी रामोड यांचे पुण्यातल्या विधान भवानातील कार्यालय तसेच क्विन्स गार्डन येथील सरकारी निवास्थान व बाणेर येथील घरावर छापा घातला. रामोड हे सुमारे दोन वर्षांपासून पुण्यात पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहत आहेत.त्यांच्याबाबत लाचखोरीच्या आलेल्या तक्रारीनंतरही आज अचानक ही कारवाई करण्यात आली.बाणेरमधील या सोसायटीत अनेक उच्चपदस्थ अधिकारी राहतात. विशेषत: राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या अनेक आधिाकाऱ्यांचा निवास या सोसायटीत आहे. परिणामी या सोसायटीत नेहमीच व्हीआयपींचा वावर असतो. मात्र, आज दुपारी अचानक अनेक मोटारीतून सीबीआयचे अधिकारी आले. त्यांनी सोसायटीच्या कोणत्याच यंत्रणेला न जुमानता अनिल रामोड यांच्या घराचा ताबा घेतला. त्यामुळे काहीवेळ सोसायटीत गोंधळा उडाला नेमके काय सुरू आहे. याचा अंदाज कुणालाच नव्हता. सीबीआयने रामोड यांच्या घरात छापा टाकल्यानंतर काहीवेळातच पोलिसांनी पैसे मोजण्याचं मशीन मागवलं असल्याची माहिती समोर येत आहे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.