Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रेकॉर्डवरील मोबाईल चोरट्यास अटक : सांगली शहर पोलिसांची कारवाई

रेकॉर्डवरील मोबाईल चोरट्यास अटक : सांगली शहर पोलिसांची कारवाई 



सांगली : येथील सांगली शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील चोरटा बालाजी लक्ष्मण चव्हाण (वय 31, रा. रामनगर 4 थी गल्ली कोल्हापुर रस्ता, सांगली) याला अटक करून मोबाईल चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणले. त्याच्याकडून 70 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला.
 
अधिक माहिती अशी, सांगली शहर पोलिस ठाणे हद्दीत मोबाईल चोरी करणा-या आरोपीचा शोध घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले होते. त्यानुसार उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदाराचे पथक तयार केले होते.

पोलिस अंमलदार संदिप पाटील व अमित मोरे मोरे यांना रेकॉर्डवरील आरोपी बालाजी चव्हाण हा संशयितरित्या बसस्थानक परिसरात चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन चव्हाणला ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता मोबाईल मिळाला. मोबाइलबाबत कसून चौकशी केल्यानंतर तीन महिन्यापूर्वी गावभाग सांगली येथून चोरल्याचे सांगितले. त्याला अटक करुन चौकशी केल्यानंतर सहा ठिकाणी मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अमलदार संदिप पाटील, विनायक शिंदे, सचिन शिंदे, डॅनियल घाटगे, अभिजीत माळकर, अमित मोरे, झाकीर हुसेन काझी, संतोष गळवे, गौतम कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.