Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सई ताम्हणकरने अफेअरबाबत केला होता खुलासा; "देखणा पैलवान माझ्या आयुष्यात होता पण....

सई ताम्हणकरने अफेअरबाबत केला होता खुलासा; "देखणा पैलवान माझ्या आयुष्यात होता पण....


अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह बॉलिवूडमध्येही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. 'आयफा', 'फिल्मफेअर' यांसारखे नावाजलेले पुरस्कार तिने पटकावले. रुपेरी पडद्यावर ती साकारत असलेल्या भूमिकांचं विशेष कौतुकही होताना दिसतं. भूमिकांमुळे तसेच कामामुळे चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीचं खासगी आयुष्य काही कोणापासून लपून राहिलेलं नाही. तिचं रिलेशनशिप, अफेअर, लग्न याबाबत यापूर्वीही अनेक चर्चा रंगल्या.

अमेय गोसावी या व्यक्तीशी सईचं लग्न झालं होतं. मात्र तिचं हे लग्न फार काळ टिकलं नाही. सईने तिच्या लग्नाबाबत काही मुलाखतींमध्ये भाष्य केलं होतं. शिवाय तिने एका कार्यक्रमात तिच्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला होता. झी मराठी वाहिनीवरील ‘कानाला खडा’ या कार्यक्रमात सई तिच्या खासगी आयुष्याबाबत भरभरुन बोलली होती. याच कार्यक्रमादरम्यान सांगलीहून मुंबईमध्ये आली असताना तिचं एका व्यक्तीबरोबर अफेअर असल्याचं तिने सांगितलं होतं. सई म्हणाली होती की, “एक खूप देखणा पेहलवान माझ्या आयुष्यात होता. तुम्ही मुंबईमध्ये आल्यानंतर हे शहर तुमच्या कानशिलात लगावतं आणि सांगतं, नेहमीच प्रॅक्टिकल राहा. तरचं तुम्ही इथे जगू शकता. हेच लक्षात ठेवून मीही सांगलीवरुन थेट मुंबईमध्ये आले”.

“अनिश्चित काळासाठी मी या शहरात आले. त्यावेळी मलाही काही निर्णय घेणं गरजेचं होतं. जगा आणि जगू द्या या वाक्यावर मला खूप विश्वास आहे. मी तो एक निर्णय घेतला. आमचं नातं पुढपर्यंत गेलं नाही. अजूनही आमच्यामध्ये उत्तम मैत्री आहे. त्याचं आता लग्न झालं आहे. त्या व्यक्तीचं नाव मला आता सांगायचं नाही. मात्र तो खरंच खूप हॉट आहे”. सईने अगदी दिलखुलासपणे या कार्यक्रमात सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलं होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.