गर्भलिंग निदान चाचणीसाठी १५ हजार रुपये घेतांना रंगेहात पकडले !
कोल्हापूर : शहरातील राजारामपुरी परिसरातील 'श्री' रुग्णालयावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने १२ जून या दिवशी धाड टाकली. या प्रसंगी रुग्णालयाच्या व्यवस्थापकास गर्भलिंग निदान चाचणीसाठी १५ हजार रुपये घेतांना रंगेहात पकडण्यात आले. या संदर्भात कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागास एका महिलेची तक्रार प्राप्त झाली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रमेश जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सांगली, कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांत गर्भलिंग चाचणी करण्याच्या घटना यापूर्वीही मोठ्या प्रमाणात उघडकीस आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गर्भलिंग निदान करणार्या टोळीला राधानगरी पोलिसांनी अटक केली होती. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातही अशीच घटना उघडकीस आली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.