Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मणेराजुरीच्या ग्रामसेवकाला सात हजाराची लाच मागितल्याबद्दल अटक

मणेराजुरीच्या ग्रामसेवकाला सात हजाराची लाच मागितल्याबद्दल अटक



सांगली : घरकुल योजनेचा हप्ता मंजूर करण्यासाठी सात हजार रुपयाची लाच मागातल्याप्रकरणी मणेराजुरी (ता. तासगाव) येथील ग्रामविकास अधिकारी महादेव विठ्ठल जाधव (रा. गणेश कॉलनी, तासगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

अधिक माहिती अशी, तक्रारदार यांना जिल्हा परिषदेकडून घरकुल योजना मंजूर झाली आहे. मंजूर निधीपैकी दुसरा हप्ता मंजुर होण्यासाठी पंचायत समिती तासगाव येथे शिफारस पाठविण्यासाठी ग्रामविकास अधिकारी महादेव जाधव याने दहा हजार रुपये लाच मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी 8 मे रोजी तक्रार दिली.

तक्रारीनुसार पडताळणी केली असता पडताळणीमध्ये ग्रामविकास अधिकारी महादेव जाधव याने तक्रारदार यांना यशवंत वसंत घरकुल योजनेचा दुसरा हप्ता मंजुरीची शिफारस पाठविण्यासाठी स्वतः व साहेबांसाठी दहा हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. तसेच तडजोडी अंती सात हजार रूपयांची लाचेची मागणी करुन पाच हजार रूपये लगेच आणण्यास सांगून उर्वरित दोन हजार रूपये दोन-तीन दिवसांत घेवून येण्यास सांगून लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

लाचेची मागणी केल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी महादेव जाधव याला अटक करुन त्याच्याविरुद्ध तासगाव पोलिस ठाण्यात येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप अधीक्षक संदीप पाटील, निरीक्षक दत्तात्रय पुजारी, निरीक्षक विनायक भिलारे, अंमलदार अजित पाटील, प्रितम चौगुले, रविद्र धुमाळ, सलीम मकानदार, ऋषीकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, उमेश जाधव, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, चालक अनिस वंटमुरे यांनी कारवाई केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.