अँड. जे.जी पाटील मेमोरियल फौंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न
सांगली : येथील अँड. जे.जी पाटील मेमोरियल फौंडेशनतर्फे शालांत परीक्षा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा रविवार दि.१८ जून २०२३ रोजी स्व.अण्णा गोडबोले सभागृह येथे संपन्न झाला. व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधीरदादा गाडगीळ व अध्यक्ष म्हणून लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शांतीनाथ कांते, सांगली अर्बन को ऑप बँकेचे अध्यक्ष गणेशराव गाडगीळ, फौंडेशनचे अध्यक्ष संजय पाटील, सचिव एच.वाय.पाटील, सांगली अर्बन को ऑप बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक इत्यादी होते. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक फौंडेशनचे सचिव एच.वाय. पाटील यांनी केले. यानंतर फौंडेशनचे विश्वस्थ व सांगली अर्बन को ऑप बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त केले. सुरवातीस नंदन परमणे यांची नेव्हीमध्ये सब लेफ्टनंटपदी नियुक्ती तसेच शैलेश बामणे यांची एम.पी.एस.सी परीक्षेतुन सहाय्यक कामगार आयुक्तपदी नियुक्ती झालेबदल आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यानंतर शालांत परीक्षा गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सत्कार मान्यवराचे हस्ते संपन्न झाला. यामध्ये मृण्मयी पाटील ९९.२०%, मृण्मयी ताम्हनकर ९९%, सोहम सुतार ९८.६०%, सृष्टी पोतदार ९८.४०%, आकांक्षा वाघ ९८% तसेच इतर अशा एकूण ३४ जणांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अहिल्यादेवी होळकर एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा शेंडगे यांचा फौंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला. यानंतर शैलेश बामणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी जे.जी पाटील मेमोरियल फौंडेशनतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.व शुभेच्छा दिल्या. तसेच शांतीनाथ कांते यांनीही फौंडेशनतच्या कार्याचे कौतुक करून उपस्थित सत्कारप्राप्त विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. आभार विश्वस्थ संजय माने यांनी मानले. यावेळी फौंडेशनचे विश्वस्थ संजय परमणे, अँड. अरविंद देशमुख, विनोद माने, जे.जी पाटील पतसंस्थेचे सुरेश माने, सोमेश्वर पाणी पुरवठा संस्थेचे संचालक शिवाजी पाटील, आकारामबापु पाटील तसेच पालक वर्ग उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.