Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंता अशोक गायकवाड यांचा धुडगूस; मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज!

सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंता अशोक गायकवाड यांचा धुडगूस; मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज!


सार्वजनिक बांधकाम विभागातील मुंबई दक्षिण विभागातील उपअभियंता अशोक गायकवाड यांनी सध्या चांगलाच धुडगूस घातला असून, गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुख्य अभियंता आर. आर. हांडे, अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी, मुंबई शहर इलाखा उपविभागाचे कार्यकारी अभियंता सी.टी. नाईक यांना बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र रचल्याचे दिसून येत आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांनी या विभागाची उंची वाढवण्याचे काम सुरू असतांना, या विभागाला बदनाम करण्याचा ठेकाच याच विभागातील दक्षिण उपविभागातील अशोक गायकवाड या उपअभियंत्यांने घेतल्याचे दिसून येत आहे. अशोक गायकवाड यांनी नियोजनबद्धरित्या आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बदनामी चालवली असून, त्यात खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण देखील सुटू शकलेले नाही. गायकवाड यांनी जी वरिष्ठांची बदनामी चालवली आहे, त्यामागे त्यांना कुणी सुपारी दिली आहे का ? यामागे नेमकी कोणती लॉबी काम करतेय ? की गायकवाड आपली आर्थिक पोळी भाजून घेण्यासाठी बदनामीचे षडयंत्र रचले आहे ? यासंदर्भातील खुलासा अशोक गायकवाड यांची सार्वजनिक बांधकाम विभागाने चौकशी केल्यानंतरच सत्य समोर येईल.

अशोक गायकवाडची चौकशी करण्याची गरज – उपअभियंता पदावर असलेल्या अशोक गायकवाड यांनी आपल्या शासकीय सेवेच्या कार्यकाळात केलेल्या मुंबईमध्ये केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची गरज आहे. त्याचबरोबर याच गायकवाड यांची अधिकार्‍यांची आणि मंत्र्यांची बदनामी करण्याची अनोखी पद्धत समोर येत आहे. गायकवाड यांचे बंधू दीपक गायकवाड हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक विश्‍वास नांगरे पाटील यांचे वर्गमित्र आहेत. त्यामुळे दीपक गायकवाड आणि विश्‍वास नांगरे पाटील यांचा फोटो डीपीला ठेवून आपण नांगरे पाटील यांच्याशी संबंधित असल्याचा गैरफायदा घेत, मंत्रालय परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्‍यांना दमदाटी करून, खोट्या केसेसमध्ये गुंतवण्याची दमदाटी करत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासोबत माझे घनिष्ठ संबंध असल्याचे दाखवून मंत्रालय परिसरात अधिकार्‍यांवर दवाब निर्माण करण्याचा प्रयत्न गायकवाड यांच्याकडून सुरू आहे.

बिंग फुटण्याच्या भीतीमुळे फिर्यादीस नकारघंटा – परवा-परवा झालेल्या एका घटनेमध्ये सी.टी. नाईक यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते अनंत पटेकर यांना अपिलासाठी बोलावले असतांना, उपअभियंता अशोक गायकवाड यांनी चार-पाच गुंड आणि काही ठेकेदार बोलावून अनंत पटेकर यांना सी.टी. नाईक यांच्या कॅबिनमध्ये मारहाण केली. मारहाण केल्यानंतर आझाद मैदान पोलिस स्टेशन येथे फिर्याद देण्यासाठी गेले असता, अशोक गायकवाड यांनी फिर्याद देण्यापासून पळ का काढला ? मारहाण केल्यामुळे भादंवि 353 नुसार गुन्हा का दाखल केला नाही. मारहाण, खंडणी यासारख्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याऐवजी गायकवाड यांनी साधी एनसी दाखल करून या संपूर्ण प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न का चालवला आहे. कारण गायकवाड यांना आपले बिंग फुटण्याची भीती वाटत असल्यामुळेच त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची वाच्यता होवू नये यासाठी पुरेपूर दक्षता घेतल्याचे दिसून येत आहे.

मंत्री रवींद्र चव्हाण, मुख्य सचिव सौनिक, सांळुखे आणि सा.बां. सचिव दसपुते यांना आवाहन अशोक गायकवाड यांची दक्षिण उपविभागातून त्वरित हाकलपट्टी करावी. अशोक गायकवाड हे, शाखा अभियंता म्हणून मंत्रालय येथे कार्यरत होते, यांनी दक्षिण उपअभियंता विभागात असलेले, सुभाष माने यांच्याविरोधात देखील षडयंत्र केले होते. याची ज्यावेळी कुणकूण मुख्य अभियंता श्री रणजीत हांडे यांना लागली असतांना, त्यांनी अशोक गायकवाड यांना एंटीग्रेटेड उपविभाग येथे नियुक्ती दिली होती, गेली 17 वर्ष मुंबई येथे अशोक गायकवाड मंडल कार्यालय अंतर्गत काम करत आहेत. याच्यामागे गौडबंगाल काय? माजी सचिव आणि समृद्धी महामार्गाचे कार्यकारी संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्या नावाचा देखील गैरवापर अशोक गायकवाड यांच्याकडून सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.