बागेत खेळायला गेली अन् सिमेंटचा बाक कोसळला;4 वर्षीय चिमूकलीने वडीलासमोरच सोडले प्राण
खारघर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बागेत खेळताखेळता एका ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. बागेतील एक सिमेंटचा बाक कोसळला. या अपघातात चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला.
सदर घटनेमुळे चिमुकलीच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, खारघरमधील ही बाग सिडकोकडून बांधण्यात आली आहे. सदर बाग सेक्टर १२ मध्ये येत असून देखभालीसाठी पनवेल महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आलीये. गेल्या काही महिन्यांपासून या बागेची पालिकेकडून देखभाल करण्यात आलेली नाही.
बागेत अनेक ठिकाणी सिमेंटच्या बाकांना तडे गेलेत. लहान मुलांसाठी असेले झोपाळे देखील तुटलेत. त्यामुळे नागरिकांनी उद्यानाच्या दयनीय अवस्थेसाठी अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार केली होती. तक्रार करुनही उद्यानामध्ये दुरुस्ती करण्यात आली नाही. सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रकाश विश्वकर्मा यांची मुलगी या बागेत खेळत होती.बाबा काम करत असताना ती सिमेंटच्या बाकाजवळ गेली. हा बाक तुटला होता. त्यावर बसण्याचा प्रयत्न करताना बाक चिमुकलीच्या अंगावर पडला. सिमेंटचा बाक तिच्यावर कोसळला. सिमेंटचा बाक अंगावर पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी या घटनेसाठी अधिकाऱ्यांवर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे.
https://ekaro.in/enkr20230828s32896828
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.