मी मेल्यावर तू रडशील का ? स्टेटस ठेवून तरूणाची आत्महत्या
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील रहिवासी असलेला व सध्या तीर्थपुरी येथे चहाचे हॉटेल चालवणारा उमदा तरुण विलास मोरे (22) या युवकाने आज 27 ऑगस्ट रोजी रांजणी येथे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मरण्यापूर्वी त्याने आपल्या व्हाटस्अप स्टेटसवर 'जीने से ज्यादा मरने मे विश्वास है' व 'मी मेल्यावर तू रडशील का?' असे दोन स्टेटस ठेवले होते.
विलास हा अत्यंत उमदा व होतकरू तरुण होता. चहाचे हॉटेल चालवत असताना त्याचे सर्वांशी अत्यंत स्नेहाचे संबंध होते. विलासने व्हॉटस् अप स्टेटस वर दुपारी सव्वा वाजता 'जीने से ज्यादा मरने मे विश्वास है' आणि दुपारी दीड वाजता 'मी मेल्यावर तू रडशील का?' असे दोन स्टेटस ठेवलेले होते. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.रांजणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याचे शवविच्छेदन सायंकाळी सहा वाजता सुरु होते. दरम्यान या घटनेची घनसावंगी पोलिसांमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ,भावजय असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येमुळे तीर्थपुरी येथे शोक व्यक्त होत आहे.
https://ekaro.in/enkr20230828s32896828
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.