Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता आम्ही बोलणार! जे बाहेर येईल ते ऐकून घरात लपून रडत बसू नका; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

आता आम्ही बोलणार! जे बाहेर येईल ते ऐकून घरात लपून रडत बसू नका; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : आम्ही उद्धव ठाकरेंवर टीका करतो तेव्हा आमची जीभ घसरली अशी बातमी पसरते. पण एका उपमुख्यमंत्री यांच्यावर बोलताना उद्धव ठाकरेंची जीभ घसरली, असं कुणीही म्हणत नाही. पण आम्ही सगळं काही सूत समेत परत करू. आता जे जे बाहेर येईल ते ऐकून घरात बसून रडायचं नाही. लपून बसायचं नाही, असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांना मी नपुसक म्हटलं तर राग येईल. फावड्या म्हटलं तरी राग येईल. यांनी सख्ख्या भावाबाबत काय केलं? स्वतःच्या वडिलांना तू आणि तुझं कुटुंब म्हातारा आणि कुत्रा म्हणायचे. तो म्हातारा जेवला का असं म्हणायचे. बाळासाहेब ठाकरे यांनी जे रुद्राक्ष घातलं होतं. ते यांनी फेकून दिलं, असे गंभीर आरोप नितेश राणे यांनी केले आहेत.


नितीन देसाई यांच्याबाबत अग्रलेख लिहिला गेला. नितीन देसाई ही चांगला व्यक्ती होती. त्यांचा स्टुडिओ त्यांनी विकत द्यावा आणि तो आम्हाला द्या असा कुणाचा दबाव होता? उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना तो स्टुडिओ हवा होता. नितीन देसाई यांना धमकी मातोश्रीच्या जवळच्या माणसाकडून येत होती, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप लावलेत.

संजय राजाराम राऊत याचा मालक आणि त्याची मालकीण यांना हा स्टुडिओ हवा होता. संजय राजाराम राऊत याचं उत्तर दे! तुझा जो ठाकरे सिनेमा आला. त्याचं शूटिंग एनडी स्टुडिओत झालं. त्याचे पैसे दिलेत का? तुझ्या मालकाने आणि मालकीनेने का नितीन देसाईवर दबाव टाकला? साडे सातनंतर तुम्हाला डीनो लागतो आणि आता नितीन देसाई…, असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय.

https://ekaro.in/enkr20230828s32898691


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.