Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आई-वडिलांकडून गर्भवती मुलीची हत्या

आई-वडिलांकडून गर्भवती मुलीची हत्या

प्रियकरावर बलात्काराचा खोटा आरोप करण्यास नकार देणाऱ्या एका गर्भवती तरुणीची तिच्याच आई-वडिलांनी हत्या केली आहे. हा भयंकर प्रकार उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरपूर येथे घडला आहे. हत्येनंतर तरुणीचा मृतदेह नदीत फेकून देण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुजफ्फरनगर जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यात पीडित तरुणी राहते. ही तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. तिचा शोध घेताना त्यांनी तिचे आई वडील कुसुम आणि बिजेंद्र यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांच्या जबाबावर संशय आल्याने पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तेव्हा आपल्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह नदीत फेकल्याची कबुली तिच्या आईवडिलांनी दिली.

https://ekaro.in/enkr20230828s32898691

पीडिता वर्षभरापूर्वी तिच्याच गावात राहणाऱ्या राहुल या तिच्या प्रियकरासोबत फरार झाली होती. पोलिसांनी तिला शोधलं आणि परत आणलं. पण, राहुल विरुद्ध बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी राहुलसोबत स्वेच्छेने पळून गेल्याचं म्हणत पीडितेने त्याच्यावर खोटे आरोप करण्यास नकार दिला होता. राहुलवर खोटे आरोप करण्यासाठी नकार दिल्यामुळेच कुसुम आणि बिजेंद्र यांनी तिची गळा घोटून हत्या केली आणि तिचा मृतदेह नदीत फेकून दिला. हत्येवेळी ती गर्भवती होती. पोलिसांना तिचा मृतदेह नदीत सापडला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.