Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सलग तीन महिने दोन सावत्र मुलं आणि नवरा 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, मोबाईल मध्ये 700 विडिओ, मुंबईतील संतापजनक घटना

सलग तीन महिने दोन सावत्र मुलं आणि नवरा 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, मोबाईल मध्ये 700 विडिओ, मुंबईतील संतापजनक घटना 


मुंबई: सलग तीन महिने दोन सावत्र मुलं आणि नवरा 32 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करत होते. नात्याला काळीमा फासणारी ही घटना मुंबईत उघड झाली आहे. मुंबईतील ट्रॉम्बे परिसरात या संतापजनक घटनेने पोलिसांचाही झोप उडवली आहे. पीडित महिलेला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत होता. एवंढ नाही तर त्या नराधमाने तिचे अश्लील व्हिडीओ काडून पॉर्न वेबसाइटवर पोस्ट केले होते.

'फ्री प्रेस जर्नल'ने दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचं पहिल लग्न मोडलं होतं. तिने 2010 मध्ये पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता. कोरोना काळात घरगुती हिंसाचारामुळे तिने पहिला पतीला सोडलं होतं. तिला पहिला पतीपासून दोन मुलं होती. एकाच वय 8 तर दुसऱ्याचं वय 10 वर्ष असं होतं. घटस्फोटानंतर पाच वर्षांनी म्हणजे 2015 मध्ये पीडित महिलेचे आरोपीशी ओळख झाली. त्यांच्यामध्ये प्रेम झालं आणि त्यांनी लगेचच लग्न केलं. आरोपीला पहिलेच दोन मुलं होती. सावत्र मुलांसह ती दुसऱ्या नवऱ्यासह ट्रॉम्बेमधील चीता कॅम्प परिसरात राहत होती. 

आरोपीचं वय 40 वर्षांचं होतं तर त्यांच्या मुलांची वय 20 आणि 22 वर्ष असं होतं. घटनेबद्दल पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं की, आरोपीनं 22 जूनला तिला गुंगीचं औषध असलेले शीतपेय दिलं. ते प्यायलानंतर ती बेशुद्ध झाली. यानंतर आरोपी पतीने आपल्या दोन मुलांनाही दारू पाजली आणि पीडितेवर सामुहिक बलात्कार केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे तो नराधम एवढ्यावरच नाही थांबला त्याने या सगळ्या अश्लील कृत्य कॅमेऱ्यात कैद केलं आणि हहा व्हिडीओ पॉर्न वेबसाइटवर अपलोड केला.

पीडितीला आरोपीच्या मोबाइलमध्ये व्हिडीओ दिसल्यानंतर सगळ्या प्रकार समोर आला. तिने शुक्रवारी (1 सप्टेंबर) पहाटे 2 वाजता आपल्या भावासह पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर नवरा आणि दोन सावत्र मुलांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात तिघांविरुद्धात गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान उपनिरीक्षक शरद नाणेकर यांनी माहिती दिली की, तिन्ही आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना सायन कोळीवाडा परिसरातून पकडण्यात आले. मुख्य आरोपीच्या फोनची तपासणी केल्यास धक्कादायक गोष्ट समोर आली. त्या नराधमाच्या मोबाइलमध्ये पत्नीचे सुमारे 700 पॉर्न व्हिडीओ होते. पोलिसांनी नराधमाची कसून चौकशी केल्यावर पत्नीच्या बलात्काराचे दोन व्हिडीओ त्यांनी पॉर्न साइटवर अपलोड केल्याची कबुली पोलिसांना दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.