Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोपर्डी हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या

कोपर्डी हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या


पुणे :  अहमदनगरच्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने पुण्यातील  येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज पहाटेच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पहाटेच्या सुमारास पोलीस गस्तीसाठी गेले असताना ही घटना उघडकीस आली. अवघ्या महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी पप्पू शिंदे हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

13 जुलै 2016 च्या संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील तीनही आरोपींना 29 नोव्हेंबर 2017 ला अहमदनगरच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. यासाठी एका विशेष फास्ट - ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.